Tuesday, November 11, 2008

शनिची स्थानगत फ़ले - व्दितीयस्थान

व्दितीयस्थानी म्हणजे धनस्थानी शनि असता तोंडात काहीतरी रोग उद्भवतो. डोळ्याचे रोग व मुखरोग होतात. आर्थिक दृष्टीने जातक संपन्न असा असतो; परंतु फ़सवणुक किंवा दंड यामुळे धनक्षय होतो. स्पष्टवक्ता व न्यायप्रिय असतो. कोणाच्याही पुढे पुढे न करण्याची वृत्ती व स्पष्टवक्तेपणा यामुळे मित्र कमी कमी होतात. सगेसोयऱ्यांशीसुध्दा संबंध नीट राहत नाही. बहुधा असे जातक जन्मस्थानापासून दूर जाऊन उपजीविका करतात. जन्मस्थानी यांचा भाग्योदय होत नाही. शनि नीचेचा किंवा दुर्बल अथवा पापग्रहाने शुभ असेल तर जातक खोटारडा, उग्र, चोरसुध्दा होऊ शकतो. याला याच्याच पत्नीपासून धोका संभवतो.

असा जातक शत्रूंचा संहार करणारा असतो. लोखंड, लाकूड किंवा कोळशाच्या व्यापारात फ़ायदा होतो. अशा जातकाला दोन पत्नी असतात. तूळ राशीचा शनि व्दितीय स्थानी चांगली फ़ळे देतो.

Monday, October 6, 2008

कोणत्या राशीला शनि साडेसाती केव्हा सुरू होते?

७) तूळ - कन्या, तूळ व वृश्चिक राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा तूळ राशीस साडेसाती सुरू होईल.
यात कन्या - अडीच, तूळ -अडीच व वृश्चिक - अडीच याप्रमाणे साडेसाती राहील.

८) वृश्चिक - तूळ, वृश्चिक व धनु राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा वृश्चिक राशीस साडेसाती सुरू होईल.
यात तूळ -अडीच, वृश्चिक - अडीच, धनु - अडीच याप्रमाणे साडेसाती राहील.

९) धनु - वृश्चिक, धनु, मकर राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा धनु राशीस साडेसाती सुरू होईल.यात वृश्चिक - अडीच, धनु - अडीच, मकर - अडीच याप्रमाणे साडेसाती राहील.

१०) मकर - धनु, मकर, कुंभ राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा मकर राशीस साडेसाती सुरू होईल.यात धनु - अडीच, मकर - अडीच, कुंभ - अडीच याप्रमाणे साडेसाती राहील.

११) कुंभ - मकर, कुंभ, मीन राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा कुंभ राशीस साडेसाती सुरू होईल.यात मकर - अडीच, कुंभ - अडीच, मीन - अडीच याप्रमाणे साडेसाती राहील.

११ मीन - कुंभ, मीन, मेष राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा मीन राशीस साडेसाती सुरू होईल.यात कुंभ - अडीच, मीन - अडीच, मेष - अडीच याप्रमाणे साडेसाती राहील.

Sunday, October 5, 2008

शनिची स्थानगत फ़ले प्रथमस्थान

प्रथमस्थान म्हणजे लग्नस्थानी शनि असता हा शनि नीचस्थ, शत्रुक्षेत्री किंवा दुर्बल असेल तर अशुभ फ़ले देतो. असा जातक विशेषत: लहानपणी अल्पश्रीमंत, आळशी, अस्वच्छ, मातापित्यांपैकी एकाचे सुख कमी असणारा, नाकात किंवा शरीरात काही व्यंग असलेला असतो. या जातकाला त्याच्यापेक्षा जास्त वयाची किंवा वयस्कर दिसणारी अशी पत्नी मिळते. याला आयुष्यही कमी असते. कफ़प्रकृती व खरजेसारखे रोग व वातरोग याला होतात. शरीर प्रकृती व्दिवर्ण व डोक्यावर केस कमी असतात. डोक्यावर मार लागण्याची भिती असते. दात मोठे असतात. कानाचे व दातांचे विकार होतात. कामुक असतो. प्रकृती स्थुल असते. फ़ारच लोभी असतो.

जर शनि बलवान असून उच्चीचा असेल, विशेषत: धनु, मीन, तूळ, मकर किंवा कुंभ राशिचा असून तो प्रथमस्थानी असेल, तर अत्यंत शुभ फ़ले मिळतात. असा जातक शत्रूचा नाश करणारा, प्रभावशाली, धनसंपत्तीने युक्त, प्रतिष्ठित, धनवान, विद्वान, समाजात अग्रणी, सुंदर, गंभीर प्रकृतीचा असतो. आयुष्यही दीर्घ असते.

Monday, April 28, 2008

कोणत्या राशीला शनि साडेसाती केव्हा सुरू होते?

१) मेष - मीन, मेष व व्रुषभ राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा मेष राशीत साडेसाती सुरू होईल. प्रत्येक राशीत मीन - अडीच वर्षे, मेष - अडीच वर्षे व व्रुषभ - अडीच वर्षे, याप्रमाणे एकुण साडेसात वर्षे शनिची साडेसाती मेष राशीला राहते.



२) व्रुषभ - मेष, व्रुषभ व मिथुन राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा व्रुषभ राशीत साडेसाती सुरू होईल. प्रत्येक राशीत मेष - अडीच वर्षे, व्रुषभ - अडीच वर्षे, मिथुन - अडीच वर्षे, याप्रमाणे एकुण साडेसात वर्षे शनिची साडेसाती व्रुषभ राशीला राहते.



३) मिथुन - व्रुषभ, मिथुन व कर्क गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा मिथुन राशीत साडेसाती सुरू होईल. प्रत्येक राशीत व्रुषभ - अडीच वर्षे, मिथुन - अडीच वर्षे, कर्क - अडीच वर्षे, याप्रमाणे एकुण साडेसात वर्षे शनिची साडेसाती मिथुन राशीला राहते.



४) कर्क - मिथुन, कर्क व सिंह राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा कर्क राशीत साडेसाती सुरू होईल. प्रत्येक राशीत मिथुन - अडीच वर्षे, कर्क - अडीच वर्षे, सिंह - अडीच वर्षे याप्रमाणे एकुण साडेसात वर्षे शनिची साडेसाती कर्क राशीला राहते.



५) सिंह - कर्क, सिंह व कन्या राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा सिंह राशीत साडेसाती सुरू होईल. प्रत्येक राशीत कर्क - अडीच वर्षे, सिंह - अडीच वर्षे , कन्या - अडीच वर्षे याप्रमाणे एकुण साडेसात वर्षे शनिची साडेसाती सिंह राशीला राहते.



६) कन्या - सिंह, कन्या व तूळ राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा कन्या राशीत साडेसाती सुरू होईल. प्रत्येक राशीत सिंह - अडीच वर्षे , कन्या - अडीच वर्षे, तूळ - अडीच वर्षे, याप्रमाणे एकुण साडेसात वर्षे शनिची साडेसाती कन्या राशीला राहते.

(पूढील सहा राशींना शनि साडेसाती केव्हा सुरू होते ते पुढच्या भागात लिहीन)

Friday, April 25, 2008

शनि कोणाला शुभ? कोणाला अशुभ?

मागच्या लेखात मी आपल्याला शनिच्या साडेसातीची ऒळख करून दिली होती आणि हेसुध्दा सांगितले होते की, शनिदेवाला भिऊन जाण्याचे काहीच कारण नाही. कारण त्याच्या दोन बाजू असतात. एक नुकसानदायक तर दुसरी कल्याणकारक. आणि शनिदेव जर क्रुपाळू झाले तर ते मानवाचे कल्याणच करतात. या लेखात मी शनि कोणत्या राशींना शुभ तर कोणत्या राशींना अशुभ फ़ळे देतो याबद्दल माहिती देणार आहे. शनि शुभफ़ळे कोणत्या राशी लग्नांना देतो - मेष, मिथुन, सिंह, धनु, कर्क, व्रुश्चिक व मीन या राशी लग्नांना शनि शुभफ़ळे देतो. शनि अशुभफ़ळे कोणत्या राशी लग्नांना देतो - व्रुषभ, कन्या, तूळ, मकर व कुंभ या राशी लग्नांना शनि अशुभफ़ळे देतो. चंद्रापासून ४, ८, १२ व्या स्थानी गोचर शनि आला म्हणजे अनिष्ट फ़ळे देतो. मूळ कुंडलीतील शनिपासून ४, ८, १२ व्या स्थानी गोचर शनि आला म्हणजे अनिष्ट फ़ळे देतो. मूळ कुंडलीतील रविपासून ४, ८, १२ व्या स्थानी गोचर शनि आला म्हणजे अनिष्ट फ़ळे देतो. आपले सहकार्य असेच मिळत राहॊ, ही शनिदेवाकडे मागणी करीत मी आपला निरोप घेते लवकरच परत येण्याचे वचन देऊन. यानंतर मी आपल्याला "कोणत्या राशीला शनि साडेसाती केव्हा सुरू होते?" याबद्दल माहिती देणार आहे.

Thursday, April 24, 2008

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम



आज मी आपणा सर्वांचा आवडता (की नावडता) विषय़ आपणासमोर आणित आहे. शीर्षक वाचून आपल्याला कल्पना आलीच असेल, की मी कशाबद्दल बोलत आहे ते? हो, मी शनिच्याच साडेसातीबद्द्ल बोलत आहे. वाचून बोबडी तर वळली नाही ना! पण घाबरू नका हो, शनि खरचं इतका काही भयंकर नाही. शनि आपल्या कुंडलीत योग्य रितीने भ्रमण करीत असतांना प्राणीमात्रांचे कल्याण करतो, पण तो वक्री मार्गाने भ्रमण करीत असतांना मानवाला हानिकारक असतो. त्याचा छळ करतो. शनि हा सूर्यमालेतील शेवटचा ग्रह आहे. तो सूर्याचा मुलगा आहे. हे तर आपल्याला नक्की माहित असणार. मात्र तो सूर्यपुत्र असूनही त्याचे कोणतेही गुण यात नाहीत. हा फ़िक्कट, निस्तेज आहे. तसेच मंद गतीने चालणारा तसेच उशिरा फ़ळ देणारा ग्रह आहे. एका राशीत तो अडीच वर्ष राहतो. ज्या राशीत शनि असेल त्या राशीच्या मागच्या व पुढच्या एका राशीला त्याचा त्रास नेहमी चालू असतो. आता शनि सिंह राशीत आहे. म्हणजे मागील रास कर्क व पुढील कन्या राशीला त्याचा त्रास सुरू आहे. जन्मकुंडलीतील चंद्राबरोबर गोचरीचा शनि आला म्हणजे तो त्या माणसाला छळतो. जन्मकुंडलीतील चंद्र राशिपासून गोचर शनि पहिल्या, दुसर्या व बाराव्या स्थानातून भ्रमण करतो, त्या साडेसात वर्षांच्या काळास साडेसाती म्हणतात. शनिची दुसरी बाजू प्रशंसनीय आहे. तो क्रुपाळू झाला , तर जातकाचे कल्याणच करतो. यासाठी मानवी जीवनाच्या महत्वाकांक्शा पूर्ण होऊन जीवन सुखी व आनंदी होण्यासाठी शनिची अनुकूलता प्राप्त करणे आवश्यक आहे. थंडपणा, नीच कर्य, घटस्फ़ोट, पती-पत्नीत मतभेद, भांडणे, चोर्या, काळा रंग, दैन्य, जनतेच्या सुखासाठी झटणारा इ. चे कारकत्व शनि ग्रहाकडे आहे. शनिच्या मकर व कुंभ या स्वराशी असून मूल त्रिकोण राशी कुंभ आहे. उच्च राशी तूळ तर नीच राशी मेष आहे. याला ३, ७, १० ह्या तीन द्रुष्टी आहे. बुध, शुक्र, राहू हे त्याचे मित्र तर रवि (सूर्य), चंद्र, मंगळ हे शत्रु आहेत. शनिचे धातु - सोने उपधातु - लोखंड रत्न - नीलमणी धान्य - उडीद पशु - म्हैस रस - तेल वस्त्र - काळे वार - शनिवार


गूढ मनाचे

सगळ्य़ांच्या मनात आपल्या भविष्यकाळातील गूढाबाबत उत्सुकता असते आणि ती उत्सुकता जाणून घेण्याचा जो तो आपापल्या परिने प्रयत्न करतच असतो. एक अनामिक भीती असते प्रत्येकाला आपल्याला भविष्याबाबत. त्यासाठी मी आपल्या सर्वांपुढे "गूढ मनाचे" हा भविष्याला वाहून घेतलेला ब्लॉग सादर करीत आहे.

गूढ मनाचे हा ब्लॉग मी खास भविष्याबद्दल आपणा सर्वांना माहिती देण्यासाठी बनवला आहे. आता आपली गैरसोय होणार नाही. आणि मला खात्री आहे की, माझ्या इतर ब्लॉग्जप्रमाणे आपण या ब्लॉगलाही भरभरून प्रतिसाद द्याल ही आशा बाळगते.