Thursday, April 24, 2008

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम



आज मी आपणा सर्वांचा आवडता (की नावडता) विषय़ आपणासमोर आणित आहे. शीर्षक वाचून आपल्याला कल्पना आलीच असेल, की मी कशाबद्दल बोलत आहे ते? हो, मी शनिच्याच साडेसातीबद्द्ल बोलत आहे. वाचून बोबडी तर वळली नाही ना! पण घाबरू नका हो, शनि खरचं इतका काही भयंकर नाही. शनि आपल्या कुंडलीत योग्य रितीने भ्रमण करीत असतांना प्राणीमात्रांचे कल्याण करतो, पण तो वक्री मार्गाने भ्रमण करीत असतांना मानवाला हानिकारक असतो. त्याचा छळ करतो. शनि हा सूर्यमालेतील शेवटचा ग्रह आहे. तो सूर्याचा मुलगा आहे. हे तर आपल्याला नक्की माहित असणार. मात्र तो सूर्यपुत्र असूनही त्याचे कोणतेही गुण यात नाहीत. हा फ़िक्कट, निस्तेज आहे. तसेच मंद गतीने चालणारा तसेच उशिरा फ़ळ देणारा ग्रह आहे. एका राशीत तो अडीच वर्ष राहतो. ज्या राशीत शनि असेल त्या राशीच्या मागच्या व पुढच्या एका राशीला त्याचा त्रास नेहमी चालू असतो. आता शनि सिंह राशीत आहे. म्हणजे मागील रास कर्क व पुढील कन्या राशीला त्याचा त्रास सुरू आहे. जन्मकुंडलीतील चंद्राबरोबर गोचरीचा शनि आला म्हणजे तो त्या माणसाला छळतो. जन्मकुंडलीतील चंद्र राशिपासून गोचर शनि पहिल्या, दुसर्या व बाराव्या स्थानातून भ्रमण करतो, त्या साडेसात वर्षांच्या काळास साडेसाती म्हणतात. शनिची दुसरी बाजू प्रशंसनीय आहे. तो क्रुपाळू झाला , तर जातकाचे कल्याणच करतो. यासाठी मानवी जीवनाच्या महत्वाकांक्शा पूर्ण होऊन जीवन सुखी व आनंदी होण्यासाठी शनिची अनुकूलता प्राप्त करणे आवश्यक आहे. थंडपणा, नीच कर्य, घटस्फ़ोट, पती-पत्नीत मतभेद, भांडणे, चोर्या, काळा रंग, दैन्य, जनतेच्या सुखासाठी झटणारा इ. चे कारकत्व शनि ग्रहाकडे आहे. शनिच्या मकर व कुंभ या स्वराशी असून मूल त्रिकोण राशी कुंभ आहे. उच्च राशी तूळ तर नीच राशी मेष आहे. याला ३, ७, १० ह्या तीन द्रुष्टी आहे. बुध, शुक्र, राहू हे त्याचे मित्र तर रवि (सूर्य), चंद्र, मंगळ हे शत्रु आहेत. शनिचे धातु - सोने उपधातु - लोखंड रत्न - नीलमणी धान्य - उडीद पशु - म्हैस रस - तेल वस्त्र - काळे वार - शनिवार


No comments: