प्रथमस्थान म्हणजे लग्नस्थानी शनि असता हा शनि नीचस्थ, शत्रुक्षेत्री किंवा दुर्बल असेल तर अशुभ फ़ले देतो. असा जातक विशेषत: लहानपणी अल्पश्रीमंत, आळशी, अस्वच्छ, मातापित्यांपैकी एकाचे सुख कमी असणारा, नाकात किंवा शरीरात काही व्यंग असलेला असतो. या जातकाला त्याच्यापेक्षा जास्त वयाची किंवा वयस्कर दिसणारी अशी पत्नी मिळते. याला आयुष्यही कमी असते. कफ़प्रकृती व खरजेसारखे रोग व वातरोग याला होतात. शरीर प्रकृती व्दिवर्ण व डोक्यावर केस कमी असतात. डोक्यावर मार लागण्याची भिती असते. दात मोठे असतात. कानाचे व दातांचे विकार होतात. कामुक असतो. प्रकृती स्थुल असते. फ़ारच लोभी असतो.
जर शनि बलवान असून उच्चीचा असेल, विशेषत: धनु, मीन, तूळ, मकर किंवा कुंभ राशिचा असून तो प्रथमस्थानी असेल, तर अत्यंत शुभ फ़ले मिळतात. असा जातक शत्रूचा नाश करणारा, प्रभावशाली, धनसंपत्तीने युक्त, प्रतिष्ठित, धनवान, विद्वान, समाजात अग्रणी, सुंदर, गंभीर प्रकृतीचा असतो. आयुष्यही दीर्घ असते.
Sunday, October 5, 2008
शनिची स्थानगत फ़ले प्रथमस्थान
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment