Tuesday, November 11, 2008

शनिची स्थानगत फ़ले - व्दितीयस्थान

व्दितीयस्थानी म्हणजे धनस्थानी शनि असता तोंडात काहीतरी रोग उद्भवतो. डोळ्याचे रोग व मुखरोग होतात. आर्थिक दृष्टीने जातक संपन्न असा असतो; परंतु फ़सवणुक किंवा दंड यामुळे धनक्षय होतो. स्पष्टवक्ता व न्यायप्रिय असतो. कोणाच्याही पुढे पुढे न करण्याची वृत्ती व स्पष्टवक्तेपणा यामुळे मित्र कमी कमी होतात. सगेसोयऱ्यांशीसुध्दा संबंध नीट राहत नाही. बहुधा असे जातक जन्मस्थानापासून दूर जाऊन उपजीविका करतात. जन्मस्थानी यांचा भाग्योदय होत नाही. शनि नीचेचा किंवा दुर्बल अथवा पापग्रहाने शुभ असेल तर जातक खोटारडा, उग्र, चोरसुध्दा होऊ शकतो. याला याच्याच पत्नीपासून धोका संभवतो.

असा जातक शत्रूंचा संहार करणारा असतो. लोखंड, लाकूड किंवा कोळशाच्या व्यापारात फ़ायदा होतो. अशा जातकाला दोन पत्नी असतात. तूळ राशीचा शनि व्दितीय स्थानी चांगली फ़ळे देतो.